गगनात भिरकावलेला चेंडू किती वर पर्यंत जातो हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे त्याकडे लागलेले असतात परंतु चेंडूला पाहणारे लोक हे विसरतात की चेंडू स्वतःच्या सामर्थ्यामुळे पुढे जात नसतो तर त्यामागे कोणीतरी पुष्कळ जोर लावलेला असतो आणि त्यामुळेच तो चेंडू आकाशात वर पर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो. तसे पहावयास गेले तर एक ठोकळा इतक्या वर पर्यंत जाऊ शकणार नाही वर जाण्यासाठी तो गोलाकार चेंडूच असावा लागतो. परंतु जी उंची तो चेंडू गाठतो त्यासाठी त्या चेंडू सोबतच त्याला भिरकवणाऱ्या व्यक्तीचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा असतो. त्याच प्रमाणे कोणीही आयुष्यात किती पुढे जाईल हे त्याला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती वर अवलंबून असते.
प्रत्येकाच्या जीवनातील ती व्यक्ती म्हणजे आपले गुरु किंवा शिक्षक. आपल्याला घडवणारे, समजावणारे, हिम्मत आणि बळ देऊन पुढे जाण्यास प्रोत्साहन देणारे सर्वजण आपल्यासाठी शिक्षकच आहेत. व्यक्ती आपल्या पैशाने किंवा सत्तेने मोठा होत नसतो तर तो आपल्या गुणांनी मोठा होतो. जोर लावून धक्का देणाऱ्याने आपले काम केल्यानंतर चेंडू चे काम आपल्यासाठी लावलेली उर्जा स्वतःमध्ये केंद्रित करून पुढे पुढे जात राहण्याचे आहे. लहानपणीच जर कोणी आयुष्यात ध्येय गाठण्याविषयी काही समजावले नसते तर कदाचित आपल्यातील पुष्कळ जण आज जीवनातल्या ज्या मुक्कामावर आहोत तेथे कदाचित नसलो असतो. आपला उत्कर्ष झाल्यानंतर आता आपल्या प्रत्येकाला कोणाच्या न कोणाच्या जीवनातील ती चेंडू भिरकावणारी व्यक्ती बनणे आहे. कोणाला तरी ती उर्जा देऊन पुढे जाण्यासाठी मदत करणे आहे. आजच्या ह्या शिक्षक दिनाच्या दिवशी प्रत्येक जण निश्चय करूया की निदान एका तरी व्यक्तीला त्याच्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन व मानसिक बळ देऊ. या शिक्षक दिनी आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या अशा सर्व मौल्यवान व्यक्तींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

No comments:
Post a Comment