तो आठवणींतला पाऊस माझ्या लहानपणी पडणारा
सगळीकडे हिरवेगार करून ठेवणारा
तो आठवणींतला पाऊस खूप खूप बरसणारा
पावसाचे थेंब अंगावर घेत उड्या मारू देणारा
तो आठवणींतला पाऊस अचानक पडणारा
मुसळधार बरसून सगळीकडे पाणी साचवणारा
तो आठवणींतला पाऊस रिपरिप पडणारा
मला बाहेर खेळायला जाऊ न देणारा
तो आठवणींतला पाऊस धो धो कोसळणारा
स्वतःसोबत माझ्या कागदी होड्यांना दूर घेऊन जाणारा
तो आठवणींतला पाऊस सोबत विजांना घेऊन येणारा
कडकडाट होताच आईच्या कुशीत शिरण्याचे भाग्य देणारा
तो आठवणींतला पाऊस मधूनच कधीतरी पडणारा
जाताना छत्री न नेलेल्या आम्हा सर्वांना भिजवणारा
तो आठवणींतला पाऊस रिमझिम बरसणारा
तनाला भिजवून मनाला बेधुंद करणारा
तो आठवणींतला पाऊस समंजस झाल्यावर पडणारा
आता पावसात भिजू शकत नाही याची जाणीव करून देणारा
तो आठवणींतला पाऊस आठवणीत गुंतवून ठेवणारा
गतकालच्या आठवणी डोळ्यापुढे उभा करणारा
तो माझ्या आठवणींतला पाऊस, प्रत्येक वर्षी
माझ्या जुन्या आठवणी आठवून देणारा
तो आठवणींतला पाऊस परत परत पडणारा
प्रत्येकवेळी पडताना ओठावर आठवणींचे हसू ठेवून जाणारा...
No comments:
Post a Comment