आपल्या मैत्रीचा मोठेपणा काय करावा
चित्रकाराने जणू सकाळचा देखावा रेखाटावा
कुंचल्यांनी अलगद रंग पाण्यात मिसळावे
अन ते हळुवारपणे कागदावर उमटावे
दोन बोटांनी त्या चित्राला अर्थ द्यावा
तसाच आपल्या दोघिंचा याराना टिकावा
तू फुल मी सुगंध, मी नभ अन् तू त्यातला चंद्र,
तुझ्या मैत्रीचीच मला आस तुझ्या मैत्रीचा मला ध्यास.
मैत्री तुझी माझी - अलगद जमिनीवर उतरणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यासारखी
सुखदुःखात सोबत देऊन एकत्र उडण्याचे बळ देणारी.
तुझ्या मैत्रीतच मला आनंद
तुझ्या मैत्रीपुढे माझ्यासाठी फिके पडले सर्व छंद.
तू पहाट मी अरुण, तुला पाहताच मन जाते भरून
मैत्री तुझी माझी जशी कप आणि त्यावरची बशी
बोटांनी अलगद ठेवावे त्या कपाला बशीवर आणि बशीनेही कुशीत घ्यावे हळुवार त्या कपाला
जोडी कधी तुटत नाही यांची
नेहमी एका सोबत साथ हवी असते दुसऱ्याला
तुझी मैत्री माझ्यासाठी पहाटेची वेळ
प्रत्येक पानावर पडेलले कोवळे उन
आणि अलगद झाडावर स्वतःला लपेटणारी वेल
मैत्री तुझी माझी - जशा पानांवर पडलेल्या दवबिंदूंच्या राशी
मैत्री तुझी माझी - जशी दिव्यात पेटत राहणारी अखंड ज्योती
कधी वाटलेच हताश तुला तरीही एकटीच नको बसू नेहमी सोबत नसलो एकमेकींच्या तरी मनात सदैव असू
पानांवरील दवबिंदूसारखे जीवन जरी क्षणभंगुर असले
तरीही आहे ते मैत्रीच्या ह्या मोत्यांनी सजलेले.
No comments:
Post a Comment